ताज्या घडामोडी

ब्रह्माकुमारीज आनंदसरोवर येथे नवरात्री (दसरा) निमित्त योग धारणा पावन पर्वास प्रारंभ

Spread the love

अंबाजोगाई (वार्ताहर)
शहरातील ब्रह्माकुमारीज आनंदसरोवर, अंबाजोगाई ओम शांती सेंटर येथे नवरात्री (दसरा) निमित्त योग धारणा पावन पर्वास प्रारंभ झाला आहे. नवरात्री पावन पर्वात दररोज सकाळी सव्वा सहा ते सव्वा सात या वेळेत साधकांच्या वतीने सेंटरमध्ये घटस्थापना करून विविध देवींची आराधना व योग धारणा करण्यात येत आहे.

याचा प्रारंभ याचा प्रारंभ दिनांक ३ ऑक्टोबर रोजी बीके राजू भाई व बीके उर्मिला माता यांनी केला. दिनांक ४ ऑक्टोबरला बीके कदम भाई व बीके सुमित्रा माता तसेच ५ ऑक्टोबरला बीके रमेशभाई व बीके उर्मिला माता, बीके राजेंद्र रापतवार, प्रणिता माता, मुळे माता यांनी योग धारणा केली. पुढील पर्वामध्ये बीके श्रीकिशन भाई, बिके सुभाषभाई, बिके काळदाते भाई, बिके करवा माता व इतर माता आणि भाई हे सहभाग घेणार आहेत. सदरील पावन पर्वास ओमशांती सेंटरच्या संचालिका बिके सुनीता बहेन, बिके मंजू बहेन, बीके प्रिया बहेन यांनी सर्व साधकांना प्रेरणा दिली. देवीच्या अष्टशक्ती, सहन करणे की शक्ती, सामना करने की शक्ती और परखने की शक्ती इत्यादी आपल्या जीवनात धारण करून सुखी, समाधानी, आनंदी जीवन सर्वांनी जगावे असा मौलिक संदेश दिला. जीवन आनंददायी व निर्विघ्न करण्यासाठी मन शांत असणे गरजेचे आहे. म्हणून चिंतन योगधरणा करणे अत्यंत महत्त्वाचे आहे असे प्रतिपादन ही केले. तसेच नेहमी सकारात्मक व्हायब्रेशन इतरांना द्यावेत ज्यामुळे वाईट प्रवृत्तीचा नाश होऊन त्यांच्या अंगी चांगले गुण येतील. प्रत्येक व्यक्तीने १६ कला धारण कराव्यात, कुणालाही त्रास देऊ नये, निसर्गनियम पाळावेत, दैवी गुण धारण करावेत, चांगले कर्म करावेत, परमात्म्याने सांगितल्याप्रमाणे वर्तन करावे इत्यादी मौलिक विचार या पर्वाच्या निमित्ताने मांडले. या प्रसंगी मोठ्या संख्येने बीके भाई व बीके माता यांची उपस्थिती होती. पुढील काळात समाजातील विविध घटकांना सोबत घेऊन दीपावली पावन पर्वाच्या निमित्ताने स्नेह मिलन घ्यावे ज्यामध्ये डॉक्टर्स, इंजिनियर, पत्रकार, व्यापारी, शेतकरी, समाजसेवक, वकील, अधिकारी, कष्टकरी या घटकांना निमंत्रित करण्याचा मनोदय अंबाजोगाई केंद्र संचालिका बिके सुनीता बहेनजी यांनी व्यक्त केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका