देवीच्या दर्शनासाठी आलेल्या ५६५ यात्रेकरूंची मोफत मधुमेह व रक्तदाब तपासणी
डॉ. अतुल शिंदे यांचा उपक्रम

अंबाजोगाई -: दसऱ्या निमित्त श्री. योगेश्वरी देवीच्या दर्शनासाठी आलेल्या ५६५ भाविकांची मोफत मधुमेह आणि रक्तदाब तपासणी करून प्रसिद्ध मधुमेह तज्ञ डॉ. अतुल शिंदे यांनी हा अनोखा उपक्रम राबविला.
श्री योगेश्वरी देवी नवरात्र महोत्सव निमित्त दसऱ्याच्या दिवशी यात्रेचे स्वरूप येते. या निमित्ताने महिला व भक्तांची मोठी गर्दी होते. देवीच्या दर्शनासाठी आलेल्या भक्तांचे आरोग्य सुरळीत रहावे. या उद्देशाने रोटरी क्लब ऑफ आंबेजोगाई सिटी,
व योगेश्वरी डायबिटीज केअर सेंटर,व आय.एम.ए. आंबेजोगाई,
यांच्या संयुक्त विद्यमानाने
श्री योगेश्वरी देवी मंदिर येथे ५६५ जणांची
मधुमेह चाचणी व रक्तदाब तपासणी करण्यात आली.या तपासणी शिबिराचे उद्घाटन
देवल कमेटीचे उपाध्यक्ष राजकिशोर मोदी,सचिव प्रा.अशोक लोमटे,सतीश लोमटे यांच्या उपस्थितीत झाले. यावेळी रोटरीचे अध्यक्ष कल्याण काळे, सचिव धनराज सोळंकी, प्रोजेक्ट डायरेक्टर,डॉ. अतुल शिंदे, को प्रोजेक्ट डायरेक्टर
सारंग पुजारी
हंसराज (बबलू) देशमुख, डॉ. अनिल केंद्रे,गोरख मुंडे,रुपेश रामावत, प्रा. रोहिणी पाठक,यांच्यासह रोटरी क्लब चे सदस्य उपस्थित होते.डॉ.अतुल शिंदे व त्यांच्या सहकाऱ्यांनी हा उपक्रम यशस्वी केला.