विद्यार्थीनींनी तयार केले विविध प्रकारचे आकाशकंदील
अंबाजोगाई -: दिवाळी म्हणजेच दीपोत्सव. दिव्यांचा सण. हा सण साजरा करीत असताना घरावर लटकविण्यात येणारा आकाश कंदील दिवाळीच्या सणाची शोभा वाढवतो. असेच विविध प्रकारचे आकाशकंदील विद्यार्थीनींनी आपल्या कलाकृतीतून साकारले आहेत.
घाटनांदूर येथील श्री सोमेश्वर कन्या प्रशालेत विद्यार्थीनींचा सर्वांगीण विकास व्हावा. हा उद्देश समोर ठेवुन प्रत्येकवेळेस नाविन्य पूर्ण उपक्रम सदैव राबविले जातात.त्यापैकी काही दिवसा आगोदर विद्यार्थीनींनी दिपावली निमित्त आकाश कंदिल बनविणे हा उपक्रम शाळेच्या मुख्याध्यापिका सविता जाधव (लोमटे ) दिवाळी निमित्त विद्यार्थिनींच्या अंगी असलेल्या सुप्त गुणांना वाव देत त्यांच्यासाठी आकाश कंदील बनविण्याची कार्यशाळा झाली.
यावेळी शाळेतील ६० गुणवंत विद्यार्थीनींनी अतीशय सुंदर स्वत:च्या हाताने तयार केलेले आकाश कंदिल बनवुन शाळेत जमा केले.या आकाश कंदिलाचे भव्य प्रदर्शन भरवुन सर्वात सुंदर आकाश कंदिल ज्यांचे आहेत,त्यांना शाळेच्या वतीने बक्षीस देण्यात येणार आहे. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेच्या पर्यवेक्षिका एस.एस.नखाते व सर्व महिला शिक्षकांनी प्रयत्न केले.या उपक्रमात पाचवी व सहावी वर्गातुन प्रथम,द्वितीय व तृतीय आलेल्या विद्यार्थानी भक्ती नामदेव गित्ते,शुभ्रा राहुल सलगरे,शबनम गणी शेख,अंजली कृष्णा फड,नजमा सज्जाद शेख व जिवीका ज्योतीराम साळुंके तसेच सातवी व आठवी वर्गातुन क्रमांक मिळवलेल्या विद्यार्थीनी मयुरी राजाभाऊ भताने,पल्लवी सदाशिव जगताप,राधिका भागवत बडे,तनुजा शिवाजी पुरी व कु.एेश्वर्या श्रीरंग चव्हाण यांचा समावेश आहे.