
कुठे-कुठे उमेदवार उभा करणार?
जालना -: मराठा आंदोलक मनोज दादा जरांगे पाटलांनी विधानसभा निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. तसेच नेमक्या कोणत्या मतदार संघात उमेदवार उभा करणार? आणि कुणाला पाठिंबा देणार हे देखील जरांगेंनी सांगितले.त्यामुळे आता महायुती आणि महाविकास आघाडीचं टेन्शन वाढलं आहे.
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांनी विधानसभा निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. तसेच नेमक्या कोणत्या मतदार संघात उमेदवार उभा करणार? आणि कुणाला पाठिंबा देणार हे देखील जरांगेंनी सांगितले.त्यामुळे आता महायुती आणि महाविकास आघाडीचं टेन्शन वाढलं आहे.
मनोज जरांगे पाटलांनी मराठा कार्यकर्त्यांशी संवाद साधताना सूरूवातीला माझी निवडणूक लढवण्याची इच्छा नाही. अशी भूमिका मांडली होती. मात्र नंतर जरांगेंनी तीन मुद्यात आपला विधानसभेचा प्लान सांगून टाकला. पहिला मुद्दा म्हणजे, जिथे निवडून येतील तिकडे उमेदवार उभं करणार, अशी घोषणा जरांगेंनी केली आहे. ज्या ठिकाणी एसटी आणि एससीच्या ज्या जागा राखीव आहेत, त्या ठिकाणी उमेदवार न देण्याचे जरागेंनी म्हटलं आहे. त्या कोणत्याही पक्षाचा उमेदवार असो, मग तिकडे महायुतीचा किंवा महाविकास आघाडीचा असो…जो आपल्या विचाराचा आहे त्याला लाखभरं मतदान फुकट देऊन निवडून आणायचं.अशी भूमिका जरांगेंनी घेतली आहे. आणि जिकडे आपण उमेदवार उभा करणार नाही, तिकडे आपण जो आपल्याला त्या 500 रूपयाच्या बाँडवर लिहून देईल, तुमच्या मागण्याशी मी सहमत आहे. त्यालाच निवडून द्यायचं नाही तर त्यांना पाडून टाकायचं, अशी भूमिका जरांगेंनी जाहीर केली आहे.
जरांगे पुढे म्हणाले, कोणत्या जागेवर उमेदवार उभा करायचा. कुठे उभा नाही करायचा याचा अभ्यास करावा लागेल.कुठे समीकरण जुळत ते मी बघत आहे.जर समीकरण नाही जुळले तर अडचण होईल. पण फॉर्म भरून ठेवा, मी 29 तारखेला म्हटलं मी फॉर्म काढ तर काढायचा.जवळपास 36 मतदार संघ आहेत, तिथे फक्त मराठ्यांच्या मतांवर निवडून येऊ शकतात. मी 3 ते 4 दिवसात कुठे उमेदवार उभे करायचे या बाबत सांगतो असं जरांगे म्हणालेत.