एसटी बस भाडे वाढीच्या निषेधार्थ शिवसेनेचे (उबाठा अंबाजोगाईत निदर्शने)

अंबाजोगाई :- महाराष्ट्र शासनाने एसटी बस प्रवाशी भाड्यामध्ये १५ टक्के ची वाढ करून गोरगरीब जनतेवर अन्याय केला आहे. या भाडे वाढीच्या निषेधार्थ अंबाजोगाई तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने सोमवारी
बस डेपो व उपजिल्हाधिकारी कार्यालय अंबाजोगाई येथे जानेवारी रोजी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे जिल्हाप्रमुख रत्नाकर शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसैनिकांनी निदर्शने केली.
यावेळी एसटी बस डेपो परिसर व कार्यालय येथील परिसर शिवसैनिकांनी घोषणा दिल्या. केवळ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीने केलेल्या फसव्या घोषणांचा पर्दाफाश होत आहे. एसटी भाडेवाढ रद्द न झाल्यास शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्यावतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा शिवसेना जिल्हाप्रमुख रत्नाकर शिंदे यांनी दिला आहे.
यावेळी शिवसेना शहरप्रमुख अशोक हेडे, उपजिल्हाप्रमुख शिवाजी कुलकर्णी, उपतालुकाप्रमुख शिवनाथ गुजर, श्रीकांत कदम,भाऊसाहेब देशमुख सुधाकर कचरे दिलीप भिसे सूर्यकांत हावळे, सुंदर धोत्रे शिवकांत कदम, बाळासाहेब वाघाळकर, शंकर भिसे, जयशंकर स्वामी उपस्थित होते.