महाएक्सपोत विविध वस्तुंचे विक्री प्रदर्शन

अंबाजोगाई (प्रतिनिधी)
दिपावली सणानिमित्त्याने उद्योग आरंभ महा एक्सपो २०२४ मध्ये पेशवा प्रतिष्ठान आयोजित वस्तू विक्री प्रदर्शनास उस्फुर्त प्रतिसाद मिळत आहे.
या प्रसंगी दीनदयाळ बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सनतकुमार बनवस्कर, उद्योजक अमोल जड,पत्रकार राहूल देशपांडे,रेखा जोशी,वैजयंती टाकळकर डॉ.महेश अकोलकर राहूल कुलकर्णी आदी मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन झाले.
याप्रसंगी व्यवसायाची निवडलेली पायवाट ही महामार्गात रूपांतरीत होण्यासाठी समाजातील व्यावसायिकांना अथक परिश्रमाची गरज असून त्यासाठी सातत्याने प्रयत्न करावेत त्याच बरोबर संयम आणि गुणवत्ता यातूनच भरभराट निश्चित होते असे मत उपस्थित पाहुण्यांनी व्यक्त केले. प्रास्तविक समन्वयक अनिता औटी यांनी केले तर संचालन डॉ महेश अकोलकर व आभार प्रतिक्षा जोशी यांनी मानले.
या प्रदर्शनात विविध सजावटीचे साहित्य,सौंदर्य प्रसाधने, ज्वेलरी,आरोग्य विषयक प्रोडक्ट,साडी व कपडे तसेच घरगुती तयार केलेले विविध वस्तू व पदार्थ याचे स्टॉल लावण्यात आले. प्रदर्शनासाठी सहकार्य करणाऱ्यांचे संघटनेच्या वतीने स्वागत करण्यात आले.
सदरील विक्री प्रदर्शनास पद्माकर सेलमुकर,संजय जवळगांवकर,सुजित दिक्षित,प्रदीप कुलकर्णी, आदीसह अनेकांनी भेटी दिल्या.
वस्तु विक्री प्रदर्शनाच्या यशस्वितेसाठी प्रमुख पदाधिकारी शुभांगी पत्की, कल्याणी कुलकर्णी शैला अकोलकर,श्रीया जोशी, मनिषा कुलकर्णी, ममता दिक्षित,वैशाली पांडे, रोहिणी जड,प्रणिता पोखरीकर,
राजश्री पिंपळे,डॉ.संकेत तोरंबेकर,अक्षय देशमुख,केदार दामोशन श्रीकांत जोशी,रामकृष्ण बाभुळगांवकर, हिरळकर यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांनी परीश्रम घेतले.