योगेश्वरी महाविद्यालयात विद्यार्थ्यांनी घेतली मतदान करण्याची शपथ

अंबाजोगाई -:
आम्ही, भारताचे नागरिक, लोकशाही वर निष्ठा ठेवून, या द्वारे प्रतिज्ञा करतो की, आपल्या देशाच्या लोकशाही परंपरांचे जतन करु. आणि मुक्त नि:पक्षपाती व शांततापूर्ण वातावरणातील निवडणूकांचे पावित्र्य राखू. व प्रत्येक निवडणूकीत निर्भयपणे तसेच धर्म, वंश, जात, समाज, भाषा यांच्या विचाराच्या प्रभावाखाली न येता किंवा कोणत्याही प्रलोभनास बळी न पडता मतदान करू.’ अशी प्रतिज्ञा शालेय विद्यार्थी व कर्मचारी यांनी घेतली.
योगेश्वरी महाविद्यालयात मतदान करण्याची शपथ विद्यार्थ्यांना, शिक्षकांना, प्राध्यापकांना, शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच उपस्थित नागरिकांना दिली. तसेच शहरातून मतदार जनजागृती रॅली काढण्यात आली.
विधानसभा निवडणूक मतदान २० नोव्हेंबर रोजी होणार आहे. या अनुषंगाने महाविद्यालयाच्या वतीने मतदार जनजागृती करण्यासाठी विविध कार्यक्रम राबवले जात आहेत. त्याचा एक भाग म्हणून तसेच जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालय, बीड यांच्या सूचनेनुसार महाविद्यालयात विद्यार्थी – विद्यार्थिनी, प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व नागरिक यांना मतदान करण्याची शपथ देण्यात आली. ‘आम्ही, भारताचे नागरिक, लोकशाही वर निष्ठा ठेवून, या द्वारे प्रतिज्ञा करतो की, आपल्या देशाच्या लोकशाही परंपरांचे जतन करु आणि मुक्त नि:पक्षपाती व शांततापूर्ण वातावरणातील निवडणूकांचे पावित्र्य राखू व प्रत्येक निवडणूकीत निर्भयपणे तसेच धर्म, वंश, जात, समाज, भाषा यांच्या विचाराच्या प्रभावाखाली न येता किंवा कोणत्याही प्रलोभनास बळी न पडता मतदान करू’ अशी प्रतिज्ञा देण्यात आली. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम. व्ही. कानेटकर, उपप्राचार्य डॉ. आर. व्ही. कुलकर्णी,उपप्राचार्य अजय पाठक, पर्यवेक्षक श्री डी. सी. डोंगरदिवे, अजय चौधरी, डॉ. आर. एच. थोरात, डॉ. आर. जे. टोपरे, एम. एच. जोशी, सचिन कऱ्हाड, एन. एम. कुमठेकर, डॉ. पी. ओ. किनगावकर, डॉ. आर. एम. कदम, डॉ. आर. आर. चिलवार, ए. व्ही. पांडे, आर. डी. स्वामी, डी. बी. वाघमारे, प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी, पालक, नागरिक, उपस्थित होते.