सिताफळ संशोधन केंद्र अंबाजोगाई येथे इंदिरा गांधी यांची जयंती साजरी

अंबाजोगाई प्रतिनिधी :- वसंतराव चव्हाण मराठवाडा कृषी विद्यापीठ अंतर्गत सिताफळ संशोधन केंद्र, अबजोगाई जिल्हा बीड येथे इंदिरा गांधी यांच्या जयंती निमित्त अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून बार्टीचे समतादूत व्यंकटेश जोशी उपस्थित होते.
कार्यक्रमात डॉ. गोविंद रावसाहेब मुंडे यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांनी इंदिरा गांधी यांच्या कार्याचा गौरव करत, त्यांचे योगदान आणि नेतृत्व कौशल्य याबद्दल उपस्थितांना मार्गदर्शन केले.
इंदिरा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून केंद्रात विविध कार्यकम आणि विचारविनिमयाचे आयोजन करण्यात आले. उपस्थितांनी त्यांचे कार्य आणि त्यांच्या सामाजिक योगदानाची प्रशंसा केली. या कार्यक्रमासाठी प्रभारी अधिकारी डॉ. गोविंद रावसाहेब मुंडे, बार्टीचे अंबाजोगाई तालुक्याचे समतादूत व्यंकटेश जोशी, कार्यालयातील कर्मचारी अशोक चाटे, प्रवीण हुग्गे, डी. ए. वाकडे, स्वप्निल मुजमुले, पी.के मुंडे, मनोहर कांबळे, सतीश पाटोळे, उस्मान शेख, अंजली महाजन आदी कर्मचारी उपस्थित होते.