सेलू अंबा टोल नाक्या नजीक अज्ञात वाहनाच्या धडकेत एक जागीच ठार तर एक जण गंभीर जखमी

अंबाजोगाई -: अंबाजोगाई-लातूर रोड वरील सेलू अंबा टोल नाक्या नजीक अज्ञात वाहनाने दुचाकी जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात एक जागीच ठार तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना आज दुपारी घडली. या जखमीस स्वाराती रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
या विषयी प्राप्त माहिती अशी की, अंबाजोगाई शहरातील रमाबाई आंबेडकर चौका नजीकच्या वसाहती मध्ये राहणारा रणजित बालाजी चिकटे( वय २५) हा आपल्या मित्रांसह एम एच 25 एए 8882 या दुचाकी हुन जात असताना अंबाजोगाई – लातूर रोड वरील सेलू अंबा टोल नाक्या नजीक अज्ञात वाहनाने या दुचाकीला जोराची धडक दिल्याने अपघातात रणजित बालाजी चिकटे हा जागीच ठार झाला तर त्याचा सहकारी हा गंभीर जखमी झाल्याने त्याला येथील स्वा रा ती रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले असून त्याचे नाव प्राप्त झालेले नाही.
या प्रकरणी अद्याप पर्यंत पोलिसात गुन्हा दाखल झाला नव्हता मात्र टोल नाक्यावरील सीसीटीव्ही फुटेज मधून अज्ञात वाहनाचा शोध लागण्याची शक्यता आहे.