योगेश्वरी देवीच्या शारदीय नवरात्र महोत्सवात धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमाची रेलचेल

अंबाजोगाई –
लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या योगेश्वरी मंदीरात घटस्थापना झाल्यानंतर ह्या शारदीय नवरात्र महोत्सवात मोठ्या भक्तीभावाने लाखो भाविक योगेश्वरीच्या दर्शनासाठी रात्रंदिवस गर्दी करीत आहेत. दरम्यान शारदीय नवरात्र महोत्सवाच्या निमित्त्याने किर्तन,प्रवचन, भजन,गायन अशा विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमाची रेलचेल असून या महोत्सवात
पं.शिवाई आरेकर यांचे क्लासिकल कथक नृत्य झाले त्यांनी आपल्या नृत्यातून विविध पदन्यास सादर केले महाराष्ट्रातील विख्यात गायक पं.शौनक अभिषेकी यांनी आपल्या गायनातून सुमधूर भक्तीगीते सादर केली उंच जाणारा आवाज उपस्थित रसिकांचे कान तृप्त करून गेला.देहू येथील तुकाराम महाराजांचे वंशज ह.भ.प.शिरीष मोरे यांनी हरिभक्तीपर किर्तनातून भगवंतांची कृपा झाल्यासच मनुष्य जन्माचे सार्थक होते कीर्तनातून सांगितले. पुण्याच्या रेवा नातु यांचे गायन बहारदार झाले पुणे येथील निनाद अनिल शुक्ल यांनीही आपल्या गायनातून रसिकांच्या मनाचा ठाव घेतला.दक्षिण कोरियातील कलावंत वोनसोंग कोरिया यांचे सुरबहार वादन झाले त्यांना पं.उद्धवबापु आपेगांवकर यांनी साथसंगत केली ह.भ.प.समाधान महाराज केज यांचे तसेच नांदगांवचे ह.भ.प.पांडुरंग कोकाटे महाराज यांचे कीर्तनही झाले.
ह्या शारदीय नवरात्र महोत्सवात लाखो भाविक योगेश्वरी मातेच्या दर्शनासाठी रात्रंदिवस गर्दी करीत आहेत.मंदीर परिसर आकर्षक पद्धतीने केलेल्या विद्युत रोषणाईने उजळून निघाला असून विद्युत रोषणाईने सजलेले मंदिर भाविकांचे लक्ष वेधून घेत आहे योगेश्वरी मातेच्या शारदीय नवरात्र महोत्सवाची मोठी परंपरा असून
योगेश्वरी देवी ही भक्तांच्या हाकेला धावून जाणारी असल्या कारणाने दिवसेंदिवस भाविकांच्या रांगा वाढतच असल्याचे चित्र दिसून येत आहेत. सकाळी अभिषेक, देवीची नित्योपचार पूजा संपन्न झाल्यानंतर दर्शन सुरू होते नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभुमीवर मंदिर परिसरात चोख बंदोबस्त तैनात करण्यात असून जागोजागी पोलीस पहारा आहे शनिवारी विजयादशमी निमित्ताने दुपारीच योगेश्वरी देवीची पालखी नियोजित मार्गाने सिमोल्लंघनासाठी निघणार असल्याचे योगेश्वरी देवल कमेटीच्या वतीने सांगण्यात आले आहे.