योगेश्वरी कन्याशाळेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाची उत्साहात सांगता

अंबाजोगाई (प्रतिनिधी ) येथील गोदावरी कुंकूलोळ योगेश्वरी कन्याशाळेच्या सुवर्ण महोत्सवाची सांगता सुप्रसिद्ध अभिनेत्री व मराठी शाळेच्या सदिच्छा दूत चिन्मयी सुमीत यांची रॅली काढून उत्साहात करण्यात आली शाळेच्या माजी विद्यार्थीनींनी व शिक्षिकांनी साकारलेल्या स्मरणिकेचे प्रकाशनही यावेळी करण्यात आले
सुरुवातीला सकाळी मान्यवरांच्या हस्ते स्वामी रामानंद तीर्थ आणि बाबासाहेब परांजपे यांच्या अर्धपुतळ्यात पुष्पहार अर्पण केला .शोभा यात्रेची सुरुवात प्रमुख अतिथींच्या हस्ते मशाल पेटवून करण्यात आली . फेटे बांधलेले शानदार ढोल पथक , खेळाडूंची पेटती मशाल,विविध वेशभूषा साकारलेल्या विद्यार्थिनी , बरची पथक ,लेझीम पथक व फूलांनी सजवलेल्या जीपमधून प्रमुख अतिथींची मिरवणूकीने सर्वांचे लक्ष वेधले होते .
शाळेच्या परिसरात शोभायात्रेचे आगमन होताच पाहुण्यांन वर पूष्पवृष्टी करून स्काऊट गाईड पथकाने त्यांचे जोरदार घोषणा देत स्वागत केले .सावित्रीबाई फुले यांच्या अर्धपुतळ्यास पुष्पहार अर्पण करून पाहुण्यांच्या हस्ते वृक्षारोपन करण्यात आले . पाहुण्यांनी विज्ञान केंद्र व मुलींच्या व्यायामशाळेलाही भेट दिली .
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष चंद्रशेखर बर्दापूरकर होते . प्रमुख पाहुण्याम्हणून सुप्रसिद्ध अभिनेत्री व मराठी शाळांची सदिच्छा दूत चिन्मयी सुमित , प्रसिद्ध गायिका मधुवंती साने , डॉ क्षमा देवशेटवार (पुणे) उपस्थित होत्या . व्यासपीठावर संस्थेचे पदाधिकारी गणपत व्यास, ॲड .जगदीश चौसाळकर , कमलाकर चौसाळकर , प्रा .माणिकराव लोमटे, प्रा भिमाशंकर शेटे, लंकेश वैद्य , सय्यद पाशू मिया , अंगद कराड, रमण सोनवळकर , डॉ . जयश्री मोटेगावकर , ॲड . कल्याणी विर्धे प्रा. अभिजीत लोहिया , प्रा. गोळेगावकर यांची विशेष उपस्थिती होती .
कार्यक्रमाची सुरुवात व्यासगुरूजी लिखीत संस्थागीत व दिपप्रज्वलन करून करण्यात आली . शिवनंदा घोडके मॅडम व त्यांचा गीतमंच यांनीही स्वागतगीत सादर केले .या प्रसंगी माजी विद्यार्थीनी डॉ क्षमा देवशेटवार , मधुवंती साने यांनी आपले मनोगत व्यक्त केले . संपूर्ण कार्यक्रमाचा आढावा समन्वयक ॲड . कल्याणी विर्धे मॅडम यांनी मांडला .प्रमुख पाहुण्या चिन्मय सुमित यांनी आपल्या मार्गदर्शनात मराठी शाळा व मातृभाषेतून शिक्षण याचे महत्त्व पटवून देत स्वतः सक्षम कसे बनवावे , स्वतःला कधीही कमी समजू नये ,आपल्याला जी बाब आवडत नाही त्याला नाही म्हणायला शिकावे असे सर्वतोपरी मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांनी विचारलेल्या अनेक प्रश्नांचे ,शंकाचे हसत-खेळत निरसन केले .तर उपजिल्हाधिकारी अहिल्या गाठाळ , प्राचार्य कविता गित्ते (कराड) , डॉ माधवी दबडे यांची प्रकट मुलाखत डॉ . संपदा कुलकर्णी यांनी घेतली . माजी विद्यार्थीनी व शिक्षिकांनी लिहिलेल्या स्मरणिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले . मधुवंती साने यांनी सुमधूर भजनावली सादर केली .
सेवानिवृत्त शिक्षिका, मुख्याध्यापिका एस . के . कराड मंगल भुसा, शंकुतला कुलकर्णी, यशोदा राठोड, मंगला लोखंडे , संगीता मुकदम, शैलजा मुळजकर, , श्रीमती दळवी, श्रीमती निळेकर , मोहन कुलकर्णी व्हि.एल. कोटुरवार यांचा सत्कार पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आला .
प्रारंभी सहसचिव डॉ. जयश्री मोटेगावकर यांनी प्रास्ताविक केले . शालेच कामकाजाची माहिती मुख्याध्यापिका मीना कुलकर्णी यांनी दिली . पाहुणांचा सत्कार पर्यवेक्षिका स्मीता धावडकर, लता सरवदे, प्रतिभा देशमुख (कुलकर्णी ), अंजली रेवडकर, मंगल कोमटवार, आशा फुलारी, तारा देशपांडे , जीजा गवळे यांनी केला . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किर्ती बेदरकर व शारदा मुंडे यांनी केले तर पाहुण्यां चा परिचय आरती जवळबळकर यांनी केला . प्रतिनिधिक स्वरूपात माजी शिक्षिका व विद्यार्थीनींनी ही मनोगत व्यक्त केले .शानदार सांस्कृतिक कार्यक्रम शाळेच्या आजी विद्यार्थीनींनी केला त्याचे सुत्रसंचलन अनिता लोंढे यांनी केले . शेवटी उपमुख्याध्यापिका ज्योती मळेकर व कार्यक्रमाच्या संयोजिका व पर्यवेक्षिका स्मिता धावडकर यांनी सर्वांचे आभार मानले . सर्व शिक्षक , शिक्षीका , शिक्षकेत्तर कर्मचारी व आजी , माजी विद्यार्थीनी शिक्षक ,शिक्षिका, व पालक वृंद यांच्या भरभरून प्रतिसादात सांस्कृतीक कार्यक्रमाने सांगता समारंभ पार पडला .