मेजर एस पी कुलकर्णी जीवन गौरव पुरस्काराने मान्यवरांच्या हस्ते सन्मानित
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्य करणारा शिक्षक - डॉक्टर सुरेश खुरसाळे

योगेश्वरी शिक्षण संस्था संचलित एनसीसी विभागाच्या वतीने रक्षामंत्री पदक प्राप्त एस पी कुलकर्णी यांना जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संस्थेचे मार्गदर्शक डॉक्टर सुरेश खुरसाळे तर प्रमुख उपस्थिती संस्थेचे अध्यक्ष चंद्रशेखर बर्दापूरकर, सचिव कमलाकर चौसाळकर, कार्यकारी उपाध्यक्ष एडवोकेट जगदीश चौसाळकर यांच्या हस्ते सपत्नीक सत्कार सन्मान करण्यात आला. यावेळी मार्गदर्शन करताना डॉ. सुरेश कुरसाळे साहेब म्हणाले, मुलांच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास केला. सायकल रॅली, सद्भावना रॅली आदींच्या माध्यमातून तसेच स्वच्छता अभियान, पर्यावरण बचाव, जल जमीन जंगल याविषयी मुलांवर संस्कार केले. त्यांनी मुलांना स्वतःची मुले समजून संस्कार केले. त्यांच्या प्रयत्नातून राष्ट्रीय स्तरावर युवक युवतींनी काम केले. तर सैन्य भरती मार्गदर्शन वसतिगृहाच्या माध्यमातून त्यांनी मुलांवर आई-वडिलांच्या भूमिकेतून संस्कार केले असे मत संस्थेच्या अध्यक्षाच्या नात्याने त्यांचा एनसीसीच्या वतीने आम्हाला गौरव आहे असे उद्गार अध्यक्ष चंद्रशेखर बर्दापूरकर यांनी व्यक्त केले. तर प्राचार्य सोमनाथ बडे, प्रा. बाळू केकान, मिलिंद गायकवाड, शिवकुमार निर्मळे, सायली वेदालंकार ,सागर प्रेम कुलकर्णी, पियुष गोरे, हर्षल लाड , प्रा.प्रवीण भोसले यांनी आपले मनोगत व्यक्त केले तर कार्यक्रमाला सामाजिक कार्यकर्ते अजय बुरांडे, प्राचार्य एम व्ही कानेटकर, प्राचार्य पोहेकर, प्राचार्य थारकर, कल्याण कुलकर्णी, संस्थेचे मार्गदर्शक प्रा.माणिकराव लोमटे, प्रा. एन .के. गोळेगावकर, प्रा. राधाकिशन आघाव, पियुष वेदालंकार, व छात्रसैनिक उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पाराजी शिंपले तर प्रास्ताविक लेफ्टनंट राजकुमार थोरात आणि आभार लेफ्टनंट साधनां चांमले यांनी केले. तर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कॅप्टन सुंदर खडके , लेफ्टनंट रोहित पाटील, हरिदास एकनाथ, चीफ ऑफिसर शैलेश कांगळे यांनी परिश्रम केले.