अंबाजोगाई परिसरात हातभट्टी दारू च्या भट्ट्यावर कारवाई
तीन लाखांचा मुद्देमाल जप्त; अप्पर पोलीस अधीक्षक चेतना तिडके यांची कारवाई

अंबाजोगाई -: शहर व परिसरात असलेल्या वाना नदीच्या पात्रात चालणाऱ्या हातभट्टी दारू च्या भट्ट्या वर बुधवारी दुपारी कारवाई करण्यात आली. या कारवाईत तीन लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई स्वतः अप्पर पोलीस अधीक्षक चेतना तिडके व त्यांच्या पथकाने केली.
बंदोबस्तातून उसंत मिळताच अप्पर पोलीस अधीक्षक चेतना तिडके यांनी भर दुपारी उन्हात वाना नदीपात्रातील डोंगरदर्यात स्वतः जाऊन दारूहातभट्टी दारू च्या भट्ट्या वर छापे टाकले. यावेळी वाणा नदीपात्रात काही लोक हातभट्टीची दारू विनापरवाना तयार करत आहेत. असे निदर्शनास आले.वाना नदी पात्रात त्याचबरोबर नागनाथ मंदिराच्या परिसरात वेगवेगळ्या टीमने छापा मारला. त्या ठिकाणी काही इसम हे हातभट्टी दारू च्या भट्ट्या लावून दारू तयार करीत होते.या ठिकाणी दोन आरोपी जाग्यावर मिळून आले. व दारूची वाहतूक करण्यासाठी एक घोडा व एक मोटरसायकल तसेच काही आरोपी डोंगरदर्याचा आश्रय घेऊन पळून गेले. मिळून आलेल्या दोन आरोपींची नावे बाबा कासम पप्पूवाले , मुस्तफा बाबा पप्पू वाले असे दोन आरोपी सापडले. त्यांच्याकडे पळून गेलेले आरोपींची नावे विचारले असता राजू गंगा चौधरी, अरे चंदू साखरवाले, अब्दुल जुम्मा चौधरी, इबुकसिम नुरीवाले ,लल्लू कासम पप्पूवाले, नदीम लुल्सवाले, मगबुल राणू परसुवाले, सर्व राहणार गवळीपुरा अंबाजोगाई. या व एकूण ९ आरोपीकडून तयार दारू व फसफसते रसायन, एक घोडा व एक मोटरसायकल असे मिळून तीन लाखाचा मुद्देमाल जप्त केला. सदरची कारवाई अप्पर पोलीस अधीक्षक चेतना तिडके, सपोनी ठाकूर, पोह देवकते, सातपुते, सुरवसे, पठाण,तानाजी तागड यांनी केली.