नगर परिषदेच्या २ लाख रुपयांची बँकेतून चोरी
एसबीआय बँकेत चलन भरण्यासाठी गेल्यानंतर झाला प्रकार

अंबाजोगाई -: नगर परिषद कर्मचारी चलनाची दोन लाख रुपयांची रक्कम एसबीआय बँकेत भरण्यासाठी गेले होते.अज्ञात चोरट्याने ही रक्कम असलेली बॅग चोरून नेली. हा प्रकार बुधवारी दुपारी घडला.
बुधवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास अंबाजोगाई नगर परिषद कर्मचारी चालानची रोख रक्कम शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेत भरणा करण्यासाठी गेला होता.दरम्यान १ लाख ८९ हजार २१२ रुपयांची रोकड चोराने लंपास केल्याची घटना घडली आहे. अज्ञात चोरट्याने बँकेत प्रवेश करून उपस्थित कर्मचारी आणि ग्राहकांच्या डोळ्यात धूळ घालून ही रक्कम चोरून नेली.
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. बँकेतील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता सीसीटीव्हीची केबल ऊंदराने कुरतडल्याने फुटेज हाती लागले नाहीत. नगर पालिकेतील शिपाई भिकाजी दामोदर शिंदे हे चालानची रक्कम भरण्यासाठी गेले होते.दरम्यान पैशाची बॅग बॅन्केतील टेबलावर ठेवली होती.त्याठिकाणी उपस्थित चोराने शिंदे यांची नजर चुकवून बॅग लंपास केली.याप्रकरणी शिंदे यांच्या फिर्यादीवरून अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या घटनेमुळे बँकेच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.पोलिसांनी नागरिकांना या घटनेबाबत काही माहिती असल्यास, ती तात्काळ पोलिसांना कळवण्याचे आवाहन केले आहे.