संविधानातील सर्वसमावेशकता हीच भारताची खरी ताकद-सुरेश सावंत

अंबाजोगाई (प्रतिनिधी)
भारतीय संविधानातील सर्वसमावेशकता हीच भारताची खरी ताकद आहे असे मत मुंबई येथील विचारवंत सुरेश सावंत यांनी व्यक्त केले. ते योगेश्वरी शिक्षण संस्थेच्या स्वामी रामानंद तीर्थ महाविद्यालयाच्या महात्मा गांधी अध्ययन केंद्राच्या वतीने आयोजित जागर लोकशाहीचा आपणा सर्वांचा या कार्यक्रमात बोलत होते. अध्यक्षस्थानी योगेश्वरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष चंद्रशेखर बर्दापूरकर होते.मंचावर योगेश्वरी शिक्षण संस्थेचे सचिव कमलाकर चौसाळकर, सहसचिव प्रा.एन.के. गोळेगावकर,प्रा.एम. एस.लोमटे, प्राचार्य डॉ.पी.आर.थारकर,
उपस्थित होते.
पुढे बोलताना सावंत म्हणाले की संविधानात स्वातंत्र्य,समता,बंधूता ही मुल्ये स्विकारल्या गेली विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या माध्यमातून देशाला अनमोल अशी देणगी दिली असून यामुळेच भारतीयांच्या प्रगतीचा मार्ग खुला झाल्याचे त्यांनी सांगितले.
अध्यक्षीय समारोपात चंद्रशेखर बर्दापूरकर म्हणाले की,भारतीय संविधान लहान वयातच मुलांना कळायला हवे, तरच संविधानाची मूल्ये जोपासली जातील सातत्याने संविधानाविषयी माहिती सांगितली गेली तर तरुण पिढी संविधाननिष्ठ निर्माण होईल.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात जागर लोकशाहीचा कार्यक्रमाच्या संयोजिका डॉ.शैलजा बरुरे यांनी संविधानातील मूल्यव्यवस्था समजून घेण्यापाठीमागची भूमिका विषद केली. सूत्रसंचालन प्रा.सविता बुरांडे यांनी केले तर आभार प्रा.ज्ञानेश्वर सोनवणे यांनी केले. मेजर कुलकर्णी, प्राध्यापक,शिक्षक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते .