लिनेस क्लब ऑफ अंबाजोगाईच्या वतीने विद्यार्थ्यांना टोपी व शैक्षणिक साहित्याचे वाटप
अंबाजोगाई (प्रतिनिधी)- लिनेस क्लब ऑफ अंबाजोगाई तर्फे जि.प.प्रा.शाळा शेपवाडी ता. अंबाजोगाई येथील एक किलोमीटर अंतरावरून शाळेत येणार्या विद्यार्थ्यांना उन्हाच्या संरक्षणासाठी पांढर्या टोपीचे व शैक्षणिक साहित्याचे वाटप दि.8 एप्रिल 2025 रोजी करण्यात आले.
यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांना शाळेच्या मुख्याध्यापिका यांनी प्लास्टिक निर्मूलनाविषयी मार्गदर्शन करून कागदी पिशव्या तयार करून घेतल्या. उन्हाळ्याच्या सुटीतील उपक्रमाविषयी संस्कार व संस्कृती संबंधी लि. पुष्पा बगाडे यांनी मार्गदर्शन केले. हस्तकले विषयी कॅबिनेट ऑफिसर लि.प्रभावती तट (अवचर ) यांनी मार्गदर्शन व प्रात्यक्षिक करून घेतले. तसेच मुलींनी केलेल्या हस्तकलेचे कौतुक लिनेसच्या अध्यक्षा लि.आशा वाघमारे, सचिव लि.ललिता पुजारी, कोषाध्यक्षा लि.आयोध्या गाठाळ यांनी केले.
या कार्यक्रमास लि. आलका तडकलकर, लि.विजया खोगरे लि. रेवती साखरे, लि.वर्षा देशमुख तसेच शाळेतील शिक्षिका सुचित्रा जाधव, शितल वेडे , आशा जाईर, प्रशांत बिराजदार तसेच माता-पालक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थिती होत्या.