ताज्या घडामोडी

कलापथक व पोवाड्याच्या माध्यमातून एचआयव्ही एड्स जनजागृती

ग्रामीण विकास मंडळाचा उपक्रम

Spread the love

अंबाजोगाई -:
कलापथक व पोवाड्याच्या माध्यमातून एचआयव्ही एड्स जनजागृती उपक्रम
ग्रामीण विकास मंडळाच्या वतीने राबविण्यात आला.
शुक्रवारी सकाळी स्वामी रामानंद रुग्णालय परिसरात महाराष्ट्र राज्य एडस् नियंत्रण संस्था मुंबई अंतर्गत जिल्हा एडस् प्रतिबंध व नियंत्रण कक्ष जिल्हा रूग्णाल्य बीड, आय सी. टी. सी. स्वा. रा. ती. ग्रा. शा. वै. म. व रु. सूक्ष्म जीवशास्त्र विभाग , व ग्रामीण विकास मंडळ बनसारोळा यांच्या संयुक्त विद्यमाने तांबवेश्वर कलापथक यांच्या माध्यमातून एचआयव्ही विषयी जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाला वैद्यकीय अधीक्षक डॉ. राकेश जाधव, सर्जरी विभाग प्रमुख डॉ. नितीन चाटे, वैद्यकीय महाविद्यालय ग्रामीण रुग्णालय आयसीटीसी विभागाचे प्रमुख डॉ अमित लोमटे यांच्या प्रमुख उपस्थितीत कला पथकातील सर्व सदस्यांचे स्वागत करण्यात आले.यावेळी शाहीर कल्याण भाऊ व त्यांच्या पथकातील सर्व सदस्य कला पथक लोककलेच्या माध्यमातून एच आय व्ही चे चार कारणे, एच आय व्ही तपासणी कोठे होते, एचआयव्ही एड्स यामुळे पसरत नाही याचा समज गैरसमज, गुप्त रोगाची लक्षणे, एचआयव्ही एड्स चाचा कायदा, गुप्त रोगाची तपासणी सुरक्षा क्लिनिकमध्ये केली जाते अधिक माहितीसाठी १०९७ या टोल फ्री क्रमांक वर कॉल करा. गरोदर मातांची एचआयव्ही तपासणी, आयसीटीसी केंद्रामध्ये एचआयव्हीची मोफत तपासणी होते, गोपनीयता, एआरटी उपचार तसेच नॅको चे ॲप डाऊनलोड करून माहिती घेऊ शकता जमलेल्या सर्व जनतेस गाण्याच्या तालावर आरोग्य विषय गीताचे पोवाडाच्या माध्यमातून सादरीकरण केले.
यावेळी ग्रामीण रुग्णालय परिसरातील रुग्णांचे नातेवाईक महिला पुरुष व वय वृद्ध त्यांची उपस्थिती लक्षणीय होती. दरम्यान स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय येथील आयसीटीसी समुपदेशक प्रदीप जिरे यांनी जमलेल्या सर्व जनतेस एच आय व्ही विषयी मार्गदर्शन केले. याप्रसंगी आयसीटीसी समुपदेशक सुकेशनी गंडले, प्रयोगशाळा तंत्रज्ञ राजेश गोस्वामी, विश्वास लवंद, सुनील घुगे,समुपदेशक सुनील गायकवाड उपस्थित होते हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ग्रामीण विकास मंडळाचे प्रकल्प व्यवस्थापक बाळकृष्ण लुंगेकर,सय्यद फारुख हुसेन ,प्रकल्प समुपदेशक भीमा कांबळे ,रेखा घाटे, विमल तरकसे ,पांचाळ किस्किंदा लिंक वर्कर स्कीम चे लेखापाल व सहनियांत्रक अर्शिया शेख , सरिता सुरवसे कविता मुंडे यांनी परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका