रोटरी क्लब ने २० मुलींना दिले बँकिंग व विमा क्षेत्रातील अभ्यासक्रमाचे मोफत संगणक प्रशिक्षण

अंबाजोगाई -: सामान्य कुटुंबातील मुली आत्मनिर्भर झाल्या पाहिजेत. या उद्देशाने महिला सक्षमीकरण अंतर्गत २० मुलींना मोफत बँकिंग व विमा क्षेत्रातील अभ्यासक्रमाचे मोफत संगणक प्रशिक्षण रोटरी क्लब ऑफ अंबाजोगाई सिटीच्या वतीने देण्यात आले.
रोटरी क्लब ऑफ अंबाजोगाई सिटी व प्रा. संतोष मोहिते यांचे कॉम्पुटर वर्ल्ड यांच्या वतीने सामान्य कुटुंबातील मुली अत्याधुनिक शिक्षण घेऊन आत्मनिर्भर झाल्या पाहिजेत. या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. या कार्यक्रमाचे उद्घाटन एच.डी.एफ.सी. बँकेच्या व्यवस्थापक शीतल बनाळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून प्रा.रोहिणी पाठक,मंजुषा जोशी, प्रकल्प समन्वयक प्रा.डॉ.शैलजा बरूरे , प्रशिक्षक प्रा. संतोष मोहिते, रोटरीचे अध्यक्ष कल्याण काळे, सचिव धनराज सोळंकी, बालाजी घाडगे,रुपेश रामावत,जतिन कर्णावट यांची उपस्थिती होती.
यावेळी बोलताना शीतल बनाळे म्हणाल्या की मुलींना बँकिंग व विमा क्षेत्रात मोठी संधी उपलब्ध आहे. त्या दृष्टीने त्यांनी अभ्यासक्रम निवडावेत व प्रशिक्षण घ्यावे. रोटरी क्लब ने मिळवून दिलेल्या संधीचा लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी केले. या वेळी प्रा.रोहिणी पाठक यांनी मुलींना बचत व आर्थिक सुरक्षितता या विषयी सविस्तर मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. संतोष मोहिते यांनी केले. संचलन मंजुषा जोशी यांनी तर उपस्थितांचे आभार प्रा.डॉ. शैलजा बरूरे यांनी मानले.