लाभार्थ्यांचे डी.बी.टी. व केवायसी ठसे उमटत नसल्यामुळे बँकेत अनुदान जमा नाही.
उपाययोजना करण्याची मानवलोक ची निवेदनाव्दारे मागणी

अंबाजोगाई (प्रतिनिधी)
श्रावणबाळ,संजय गांधी निराधार योजना डी. बी. टी. सक्तीचे केले ही गोष्ट चांगली पण वृध्दांचे ठसे उमटत नसल्यास त्यांना अनुदान देण्यासंबंधीचे निवेदन उपजिल्हाधिकाऱ्यांना मानवलोकच्या वतीने देण्यात आले.
त्यात नमुद केले आहे की,अंबाजोगाई तालुक्यात तीस हजारापेक्षा जास्त निराधार राष्ट्रीयकृत बँकेतून अनुदान उचलतात. चार महिन्यापुर्वी लाभार्थ्यांना त्यांच्या खात्यावर अनुदान जमा झाले. परंतू जानेवारी महिन्यात एक महिन्याचे अनुदान आर्ध्या लाभार्थ्यांना मिळाले मात्र उर्वरीत लाभार्थीना डी. बी. टी. सक्तीचे केल्यामुळे बँकेतून अनुदान मिळाले नाही. बँकेशी व तहसील कार्यलयाशी संपर्क केला असता, तहसील कार्यालयातून डि.बी.टी. व केवायसी फॉर्म भरा तरच तुम्हाला अनुदान पडेल अन्यथा पडणार नाही असे सांगण्यात आले.
लाभार्थी बँकेत गेले असता त्यांचे अंगठ्यांचे ठसे व्यवस्थित उमटले जात नाहीत कारण त्यांच्या आंगठ्यावरील रेषा नाहीशा झालेल्या आहेत. तसेच काही जणांच्या हाताला बोटे नसल्यामुळे व डोळे निकामी झाल्यामुळे केवायसी फॉर्म अपडेट होत नाही. त्यामुळे त्यांच्या खात्यावर अनुदान पडले नाही. अशा लाभार्थ्यांसाठी शासनाने वेगळा निर्णय घेवून आहे त्या बँकेत अनुदान देण्याची व्यवस्था करावी. कारण आज घडीला बँकेत अनुदान न पडल्यामुळे वृध्द निराधार अनुदान बंद झाले की काय? या अनुदानावरच वृध्दांची उपजीवीका, औषध उपचार अवलंबून आहेत.
तसे पाहीले तर डी. बी.टी. ही संकल्पना चांगली आहे परंतू काही लाभार्थ्यांना डी.बी.टी. व केवायसी ठसे उमटत नसल्यामुळे बँकेत अनुदान येत नाही. त्यामुळे आहे त्या बँकेत त्यांचे अनुदान ताबडतोब पाठवून त्यांच्यावर उपासमारीची वेळ येणार नाही याची दखल आपल्या कार्यालयाने घ्यावी असे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. त्यावर मानवलोकचे कार्यवाह अनिकेत लोहिया, शाम सरवदे, संजना आपेट, सावित्री सागरे यांच्यासह इतरांच्या स्वाक्षऱ्या आहेत.