नेतृत्व प्रस्थापित होण्यासाठी वक्तृत्व आवश्यक . प्रा. डॉ. जयदेव डोळे

अंबाजोगाई (प्रतिनिधी) नेतृत्व विकसित होण्यासाठी फर्डे वक्तृत्व असणे गरजेचे आहे, वक्तृत्वातून स्वतः ची ओळख निर्माण झाली पाहिजे असे मत ज्येष्ठ विचारवंत डॉ. जयदेव डोळे यांनी व्यक्त केले. येथील योगेश्वरी शिक्षण संस्थेच्या स्वामी रामानंद तीर्थ महाविद्यालयाच्या वतीने आयोजित स्व. प्राचार्य भ. कि. सबनीस राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी डॉ. जयदेव डोळे यांनी सुभाषचंद्र बोस, महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, स्वातंत्रवीर सावरकर यांच्या वक्तृत्व शैली बद्दल माहिती दिली. गांधीजी फर्डे वक्ते नव्हते पण आचरणातून त्यांचे नेतृत्व विकसित झाले. तरुण वक्त्यांनी अभ्यासातून, स्पष्ट विचारातून आपली वक्तृत्व क्षमता विकसित करावी असे मत डॉ. जयदेव डोळे यांनी व्यक्त केले . तरुण वक्त्यांनी सभ्य, संयमी भाषेत मांडणी केली तरीही परिणामकारकता साधता येते . संविधानाची मूल्ये जोपासणाऱ्या वक्तृत्व स्पर्धांचे महत्व वाढले पाहिजे असे मत डॉ. जयदेव डोळे यांनी व्यक्त केले.
या राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेच्या उद्घाटन समारंभाचा अध्यक्षीय समारोप योगेश्वरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष चंद्रशेखर बर्दापूरकर यांच्या संबोधनाने झाला. स्व. प्राचार्य भ. कि. सबनीस यांच्या विचारकार्याविषयी त्यांनी मत व्यक्त केले.सबनीस सरांचे वाचन प्रचंड होते त्यांनी आपल्या कार्यातून समाज घडविण्याचा प्रयत्न केला, तरुणवर्ग नवनिर्माण करु शकतो ही प्राचार्य सबनीस सरांची धारणा होती.अंबाजोगाईला सबनीस सरांनी बरेच कांही दिले आहे असे मत व्यक्त केले.
या वकृत्व स्पर्धेच्या निमित्ताने महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. आर. थारकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक वक्तृत्व स्पर्धेचे संयोजक, राज्यशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा. रमेश सोनवळकर यांनी केले. उद्घाटन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नाट्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ. संपदा कुलकर्णी यांनी केले तर आभार प्रदर्शन राज्यशास्त्र संशोधन केंद्राच्या व पदव्युत्तर विभागाच्या संचालिका डॉ. शैलजा बरुरे यांनी केले.
या कार्यक्रमाला योगेश्वरी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष गणपत व्यास, कार्यकारी उपाध्यक्ष अँड. जगदीश चौसाळकर, योगेश्वरी शिक्षण संस्थेच्या कार्यकारी मंडळाचे सदस्य प्रा. माणिकराव लोमटे, प्रा. एन. के. गोळेगावकर, श्री रमन सोनवळकर, जेष्ठ पत्रकार अमर हबीब,प्रा. संभाजी बनसोडे, श्री. पी. एन. कुलकर्णी, संतराम कराड, अँड. अजय बुरांडे,प्रा. मेजर एस. पी. कुलकर्णी, प्रा. डॉ. गणेश पिंगळे, स्पर्धेचे परीक्षक म्हणून खोलेश्वर महाविद्यालयाचे मा. उपप्राचार्य डॉ. दिगंबर मुडेगावकर, योगेश्वरी महाविद्यालयाचे सेवानिवृत्त उपप्राचार्य व्हि. एन. जोशी, बी.एस.पी. एम. शिक्षणशास्त्र महाविद्यालयातील प्राध्यापक डॉ. होळकर मॅडम , योगेश्वरी नूतन विद्यालयातील श्री. भागवत मसने सर , विविध महाविद्यालयातून आलेले स्पर्धक विद्यार्थी, महाविद्यालयातील प्राध्यापक कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.