ताज्या घडामोडी

लोकनेते मुंडे साहेबांना अभिवादन करण्यासाठी १२ डिसेंबरला गोपीनाथ गडावर उसळणार अलोट गर्दी

आ. पंकजाताई मुंडे, डॉ.प्रीतमताई मुंडे यांची उपस्थिती

Spread the love

आपापल्या गावात, वॉर्डात जयंती साजरी करा ; मुंडे साहेबांचे संस्कार जिवंत ठेवण्यासाठी सदैव कार्यरत राहण्याचे वचन द्या

परळी वैजनाथ।दिनांक १०।
लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी येत्या १२ डिसेंबर रोजी गोपीनाथ गडावर राज्याच्या कानाकोपर्‍यातून मोठी गर्दी उसळणार आहे. भाजपच्या राष्ट्रीय सचिव आ. पंकजाताई मुंडे, माजी खासदार डाॅ.प्रितमताई मुंडे यावेळी उपस्थित राहणार आहेत. दरम्यान
आपापल्या गावात, वॉर्डात जयंती साजरी करा तसेच मुंडे साहेबांचे संस्कार जिवंत ठेवण्यासाठी सदैव कार्यरत राहण्याचे वचन द्या असं आवाहन आ. पंकजाताईंनी केलं आहे.

यासंदर्भात आ. पंकजाताई मुंडे यांनी सोशल मीडियातून राज्यभरातील कार्यकर्त्यांना महत्वाचा संदेश दिला आहे, त्या म्हणाल्या, विधानसभा निवडणुकीत मराठवाड्यात महायुतीला अभूतपूर्व असं यश मिळालं आहे. या यशाबद्दल १२ डिसेंबरला मुंडे साहेबांच्या जयंतीनिमित्त महायुतीच्या सर्व आमदारांचा सत्कार तसेच मुख्यमंत्री आणि उप मुख्यमंत्री यांना गोपीनाथ गडावर निमंत्रित करण्याची माझी इच्छा होती. परंतू शपथविधीच्या अनिश्चित तारखांमुळे हे होऊ शकत नाही. असा कार्यक्रम जंगी मी नंतर भविष्यात घेईलच. परंतू सध्या मुंडे साहेबांची जयंती अत्यंत साध्या पध्दतीने साजरी करण्याचा निर्णय मी घेतला असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

मुंडे साहेबांचे संस्कार जिवंत ठेवण्यासाठी सदैव कार्यरत रहा

पुढे बोलतांना आ. पंकजाताई म्हणाल्या, १२ डिसेंबरला मी सकाळी ११ वा. गोपीनाथ गडावर येईल. सकाळी ११ ते दुपारी २ वा. दरम्यान गडावर नेहमीप्रमाणे कार्यक्रम होतील. ज्यांना यादिवशी यायला जमणार नाही, त्यांनी परंपरेप्रमाणे आपापल्या गावांमध्ये, वाॅर्डामध्ये मुंडे साहेबांची जयंती साजरी करावी व त्यांना अभिवादन करावे आणि मुंडे साहेबांचे संस्कार जिवंत ठेवण्यासाठी सदैव कार्यरत राहण्याचं वचन द्यावे असे आवाहन केले आहे.
••••

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका