बीड जिल्हा रोटरी कॉप्स च्या अध्यक्षपदी संतोष मोहिते तर सचिव पदी सुरेश भानप

अंबाजोगाई -: बीड जिल्हा रोटरी कॉप्स च्या अध्यक्षपदी प्रा. संतोष मोहिते यांची तर सचिव पदी सुरेश भानप यांची सर्वानुमते निवड झाली.
बीड जिल्हा रोटरी कॉप्स हि बीड जिल्ह्यातील सर्व रोटरी क्लब च्या आजी, माजी अध्यक्ष यांची संघटना आहे. रोटरी क्लब ऑफ अंबाजोगाई सिटी च्या वतीने आयोजित कार्यक्रमात माजी प्रांतपाल हरीश मोटवानी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत वर्ष २०२४-२६ या कालावधी साठी नूतन कार्यकारणी निवडण्यात आली. यात अध्यक्ष म्हणून संतोष मोहिते, सचिव .सुरेश भानप, उपाध्यक्ष सुदर्शन हेरकर, कोषाध्यक्ष गणेश वाघ, सहसचिव परमेश्वर शिंदे तर सदस्य पदी कल्याण कुलकर्णी, दादा जमाले, सतीश भालेराव या सर्वांची बिनविरोध निवड करण्यात आली. जिल्ह्यातील सर्व क्लबना एकत्र जोडून रोटरी च्या माध्यमातून जिल्हाभर विविध उपक्रम राबविण्याचा मानस नूतन कार्यकारणी ने केला आहे.
या बैठकीस कार्याध्यक्ष दीपक कर्नावट, माजी अध्यक्ष संतोष पवार, माजी उपाध्यक्ष नीलकंठ साबळे मार्गदर्शक प्रवीण देशपांडे, अंबाजोगाई सिटी चे अध्यक्ष कल्याण काळे, सचिव धनराज सोलंकी व जिल्हयातील सर्व क्लब चे आजी माजी अध्यक्ष उपस्थित होते.