ॲड. अनंतराव जगतकर यांनी काँग्रेस पक्षाचा केला त्याग

अंबाजोगाई -: येथील काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते, काँग्रेस पक्षाचे प्रदेश प्रतिनिधी ॲड. अनंतराव जगतकर यांनी आपल्या पदाचा त्याग केला. ही घोषणा त्यांनी अंबाजोगाईत मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत केली.
ॲड. अनंतराव जगतकर हे केज विधानसभेसाठी काँग्रेस पक्षाकडून इच्छुक होते. मात्र काँग्रेस पक्षाच्या राज्यसभा खासदार रजनी पाटील यांनी आपल्या उमेदवारी कडे दुर्लक्ष केल्याचा आरोप ही त्यांनी केला.काँग्रेस पक्षाची भूमिका बोन्साय सारखी असल्याचा आरोप ही त्यांनी केला. आपण निवडणूक लढविण्याची संपूर्ण तयारी केली होती.पण काँग्रेस पक्षाने बीड जिल्ह्यातील एकही जागा विधानसभेसाठी मागितली नाही.त्यामुळे आपण काँग्रेस पक्षाचा त्याग केला असल्याचे सांगितले.
ॲड. अनंतराव जगतकर हे काँग्रेस पक्षाचे जुने पदाधिकारी आहेत.गेली ५० वर्षे ते विविध पदांवर कार्यरत होते. सन १९८५ साली त्यांनी केज विधानसभा मतदार संघातून काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून निवडणूक लढवली होती.त्यांचा निसटता पराभव झाला होता. त्यांना यावेळीही काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढविण्याची इच्छा होती.तशी तयारी ही त्यांनी केली होती.